fbpx
Thursday, September 28, 2023
MAHARASHTRA

कोरोनाबाधित रुग्ण 20 तासांपासून संशयितांच्या कक्षातच, सिव्हीलचा भोंगळ कारभार

परभणी, दि.14 – जिल्हा शासकीय रुग्णालयात संशयित म्हणून दाखल केलेल्या युवतीचा स्वॅब शनिवारी(दि.14) रात्री नऊच्या सुमारास पॉझिटीव्ह येवून सुध्दा रुग्णालय प्रशासनाने त्या कोरोनाबाधित युवतीस रविवारी (दि.14) सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्वतंत्र अशा संक्रमीत कक्षात स्थलांतरीतचं केले नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
कारेगाव रस्त्यावरील वृंदावन कॉलनीतील 21 वर्षीय युवती बारामतीहून परतलेल्यानंतर काहीसा त्रास जाणवल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाली. वैद्यकीय अधिका-यांनी त्या युवतीचा स्वॅब घेवून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस पाठविला. त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनास शनिवारी रात्री मेलद्वारे प्राप्त झाला. त्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह निघाला. रुग्णालय प्रशासनाने लगेचच जिल्हा प्रशासना, महापालिकेस त्या संदर्भात कल्पना दिली. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी तातडीने वृंदावन कॉलनी परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केले. महापालिका प्रशासनाने त्या भागात निर्जतुकीरणाचे काम सुरू केले.

महसुल व मनपाने एकीकडे लगेचच सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य उपाययोजना सुरू केल्या असतांना जिल्हा रुग्णालय प्रशासनाद्वारे त्या कोरोनाबाधित युवतीस संशयितांच्या कक्षातून संक्रमीत कक्षात तात्काळ स्थलांतरीत क्रमप्राप्त होते. परंतू दै.दिलासाच्या प्रतिनिधीने रविवारी रुग्णालयातील संशयिताच्या कक्षातील रुग्णांच्या संख्येसह अन्य गोष्टीची माहिती घेतली तेव्हा कोरोनाबाधित युवती त्याच कक्षात रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हजर होती. त्या कोरोनाबाधित युवतीस संक्रमीत कक्षात तात्काळ का, स्थलांतरीत केले नाही. यागोष्टीचा दै.दिलासाने मागोवा घेतला. तेव्हा कागदोपत्रे घोडे नाचविण्याच्या तांत्रिक व औपचारिक कारणामुळेच त्या युवतीस संक्रमीत कक्षात स्थलांतरीत न केल्याची खळबळजनक माहिती आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: