fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

विराज जगताप हत्याकांड; ‘वंचित’ च्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

पिंपरी चिंचवड – वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे विराज जगताप या तरूणाची आंतरजातीय प्रेम प्रकरणातून गावगुंडांनी हत्या घडवून आणली. या गावगुंडांना कडक शासन झाले पाहिजे व मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत. फास्टट्रॅक वरती हा खटला चालवण्यात यावा. ॲट्रॉसिटीच्या माध्यमातून शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत पीडित कुटुंबाला देण्यात यावी. या विषयावरती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य महिला आघाडी सदस्य रोहिणी ताई टेकाळे भारिप बहुजन महासंघाचे माजी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन पिंपरी-चिंचवड, शुभम चव्हाण सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र जाधव वंचित पुणे शहर महासचिव अध्यक्ष कमलेश वाळके विठ्ठल नगर नेहरु नगर प्रभाग क्रमांक-९ माजी अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ परमेश्वर चौधरी माजी शहर संघटक, ज्ञानेश्वर चव्हाण आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: