fbpx

‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधील ‘या’ अभिनेत्याचं निधन

हिंदी-गुजराती मालिका आणि नाटकांमधून आपल्या भूमिकेनं प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता जगेश मुकाटी यांचं निधन. जगेश यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर 4 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालवली आणि त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. बुधवारी दुपारी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा अकाली निधनानं कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

img_20200611_1905075281319577473116864.jpg

जगेश मुकाटी यांनी अनेक हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये काम केलं. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतही काम करून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. ‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’ यांसारख्या मालिका आणि ‘हसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेत्री अंबिका रांजणकरने यांनी सोशल मीडियावर जगेश यांच्यासोबतचा फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जगेश यांच्या अकाली जाण्यानं गुजराती आणि हिंदी मालिका आणि कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचा खेदही त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कलाक्षेत्रात अनेक दिग्गज कलाकलांच्या निधानानं पोकळी निर्माण झाली आहे. इरफान खान, ऋषी कपूर, संगीतकार वाजिद खान, दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांच्यासारखे अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: