fbpx

साईस्नेह हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सन्मान

पुणे, दि. 10 : कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय आणि पोलिस कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत आहेत.तसेच साईस्नेह हॉस्पिटलमध्ये गेल्या अडीच महिन्यापासून लॉकडाऊनच्या कालावधीत कर्मचाऱ्यांनी सुट्टी न घेता अखंडपणे सातत्याने कार्य सुरू ठेवले. आशा कर्मचाऱ्यांचा कात्रज येथील साईस्नेह हॉस्पिटल तर्फे सोशल डिस्टनसिंग’चे पालन करत साईस्नेह हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात “कोरोना वॉरियर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे यांच्या हस्ते झाले. यावेळी साईस्नेह हॉस्पिटलचे व्यवस्थापकिय संचालक डॉ. सुनील जगताप व संचालक डॉ. सुमित जगताप उपस्थित होते.

त्यात प्रामुख्याने साईस्नेह हॉस्पिटलच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्‍टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आयसीयूमधील डॉक्टर परिचारिका, वार्डचे डॉक्टर, परिचारिका ,डायलेसिस व एक्सरे विभागाचे टेक्निशीयन, रिसेप्शन, मेडिकल स्टोअर्स ,पॅथालॉजी विभागातील टेक्निशियन अशा हॉस्पिटलच्या 35 हुन अधिक कर्मचारी वर्गाचा “कोरोना वॉरियर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. सुनील जगताप म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी सुट्टी न घेता कर्तव्य बजावत राहिले. तसेच अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी कोरोनविरोधात योद्धा पातळीवर काम करत आहेत. दरम्यान या कोरोना वॉरियर्सचे धैर्य, कर्तव्य, निःस्वार्थ त्याग आणि समर्पणासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.”

पोकळे म्हणाल्या,”कोविड 19 च्या विरोधात लढा देण्याचे आव्हानात्मक कार्य या कोरोना वॉरियर्सने हाती घेतले आहे. या कठीण काळात वॉरियर्सनी दाखविलेला उत्साह अतुलनीय आहे. यासाठी देशातील सर्व नागरिकांकडून नक्कीच त्यांना कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे.”

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगिता डोळस यांनी केले. तर जया कोरडे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : कात्रज : साईस्नेह हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉ. सुनील जगताप आणि डॉ. सुमित जगताप,स्वाती पोकळे यांच्या सह इतर वैद्यकीय कर्मचारी. होते.

Leave a Reply

%d bloggers like this: