fbpx
Saturday, December 2, 2023
ENTERTAINMENT

वात्रट सोसायटीमध्ये होणार गुंडापपाची एंट्री  

आठशे खिडक्या नऊशे दारं या मालिकेनं थोड्याच दिवसांत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या विषयाची मेजवानी घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. सोळा कलाकारांची फळी या मालिकेत काम करताना दिसत आहे. दर आठवड्याला नवनवीन कलाकार आपल्याला पाहायला मिळताहेत. अशाच एका अतरंगी पात्राची एंट्री लवकरच होणार आहे.

बसवराज रामलिंगम मोक्षगुंडम सुब्रमण्यम वेंकटेशम गुंडाप्पा अर्थात नुसताच गुंडाप्पा हे पात्र सर्वांचा लाडका पंढरीनाथ कांबळे साकारणार आहे. आपल्या विनोदी अभिनयानं आजपर्यंत पंढरीनाथ उर्फ पॅडीनी सर्वांना हसवलं आहे. आताही तो अशाच एका विनोदी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

थोडक्यात सांगायचं तर गुंडाप्पा कन्नड आहे आणि तो भीषण मराठी बोलतो. तो अतिशय बेसूर गायक आहे. गुंडाप्पाच्या या एंट्रीमुळे वात्रट सोसायटीत अजून काय धमाल उडते, हे बघण्यासाठी पाहत राहा आठशे खिडक्या नऊशे दारं सोमवार ते गुरुवार रात्री 10 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

%d bloggers like this: