fbpx

स्मिता पाटीलच्या जीवनावरील ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ’ जागतिक पातळीवर…

इंग्लंडमधील लघुपट महोत्सवासाठी श्रीनिवास वारूंजीकर यांच्या लघुपटाची निवड


सातारा, दि. ९ – पाईनवूड स्टुडिओज, इंग्लंड आयोजित वर्ष २०२० च्या लिफ्ट आँफ सेशन्स आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी, सातारा येथील कवी, पत्रकार श्रीनिवास वारूंजीकर दिग्दर्शित ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ’ या लघुपटाची निवड झाली आहे. मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या भूमिका आणि वास्तव जीवन या विषयावरील हा लघुपट असून, या निवडीबद्दलचा ईमेल, संयोजकांकडून वारूंजीकर यांना आला आहे.
विशेष म्हणजे,फिल्म डायरेक्‍शनमध्ये वारूंजीकर यांचे हे पहिले पाऊल आहे. स्मिता पाटीलच्या व्यक्तित्त्वाने झपाटलेली, क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि पुण्यातील “पंख’ संस्थेची कार्यकर्ती मृणाल घोळे-मापुस्कर ही या फिल्मची निर्माती असून तिने यामध्ये भूमिकाही केली आहे. तसेच फिल्मचा व्हॉईस ओव्हरही तिच्याच आवाजात आहे. संकल्पना, संहिता आणि दिग्दर्शन वारूंजीकर यांचीच असून सातारचाच कुमार डोंगरे याने एडिटींग, म्युझिक आणि शूटींगची जबाबदारी सांभाळली आहे. मेक-अप ज्योती जाधव यांनी तर सबटायटल्सची जबाबदारी संगीता कांजलकर यांनी सांभाळली आहे.

सदर महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा लघुपट आठ दिवस प्रदर्शित केला जाईल. त्यावर जगभरातील सिनेरसिक आणि परिक्षक आपला अभिप्राय देतील. त्यानंतर महोत्सवाच्या निकालाची घोषणा होईल. याबद्दल वारूंजीकर आणि मापुसकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: