ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांची आई माधवी राजे शिंदे यांना ४ दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत होती. पण त्यांच्या आईमध्ये कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. पण दोघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
लॉकडाऊनपासूनच ज्योतिरादित्य शिंदे हे दिल्लीत आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दिल्लीत आहेत. पण चार दिवसांपूर्वी अचानक ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात कोरोनाचे लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. ते काँग्रेसचे महासचिव होते. पण त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे भाजपमध्ये आल्यानंतर मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार पडलं. भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.