fbpx

भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल देवळेकर यांचा पुढाकार

पुणे, दि. ८ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलवावे यासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल देवळेकर यांनी ऑनलाईन पिटीशन दाखल केली आहे.

जनतेच्या भावना व्यक्त व्हाव्यात यासाठी ‘चेंज डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर ही पिटीशन दाखल केली असून त्यावर नागरिकांनी संमती दर्शक प्रतिसाद द्यावा ,असे आवाहन केले आहे. ‘चेंज डॉट ओआरजी’’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. डॉ. अमोल देवळेकर यांनी ही ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. याबाबत डॉ. अमोल देवळेकर यांनी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली असून सोशल मीडियाद्वारे आवाहन केले आहे.
‘ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी विराजमान आहेत..राज्यातील गेल्या सहा महिन्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलाय .या वयात राज्यपाल महोदयांच्या प्रकृतीवर अतिरिक्त ताण येणाऱ्या सर्व घटना आहेत.अगदी प्रातःविधी आधी शपथविधी,सारखेच चहापाण्यास येणारी मंडळी हे सगळे प्रकार राज्यपाल महोदयांच्या आरोग्यास घातक आहेत.राज्यपाल पदाच्या महानतेला न शोभणारी चिखलफेक मनाला दुःखी करते .शिवराम हरी राजगुरूंच्या या राज्यात भगतसिंग नाव धारण केलेल्या व्यक्तीची सत्तालोलुप राजकारणाच्या पोटी इतकी अवहेलना नको. हे सगळे तमाम मराठी माणसांना वेदनादायी आहे तेव्हा लवकरात लवकर त्यांना दिल्लीत सन्मानपूर्वक परत बोलवावे ही नम्र विनंती ! ‘,असे डॉ अमोल देवळेकर यांनी त्यांच्या आवाहनात नमूद केले आहे.

त्यांची याचिका (पिटीशन) ही ‘चेंज डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर ही पिटीशन दाखल झाली आहे. त्यावर नागरिक संमतीदर्शक प्रतिसाद देत असून आपापली मतेही व्यक्त करीत आहेत. http://chng.it/w8ywxDbV या संकेतस्थळावर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: