fbpx

सुष्मीता सेनची आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री

अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाली असून तिच्या पहिल्या वेब सीरिजचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. सुष्मिता सेन ‘आर्या’ नावाच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ही हॉटस्टारची ओरिजनल सिरीज आहे, ज्यामध्ये सुष्मिता अडचणींना तोंड देणार आहे.

या थरारक वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन आर्या नावाच्या महिलेची भूमिका साकारत आहे. आर्या तिचा नवरा आणि मुलांसोबत राहते आणि तिला हे माहित नाही की तिचा नवरा ड्रग्सचा व्यवसाय करतो, जो बेकायदेशीर आहे. आर्या आपला सर्व वेळ कुटुंबात देणारी महिला असते. अशा परिस्थितीत जेव्हा तिच्या पतीवर हल्ला होतो तेव्हा तिला सत्याची जाणीव होते, त्यानंतर आर्याला परिस्थिती स्वतःच्या हातात घ्यावी लागते. ट्रेलरमध्ये सुष्मिताच्या भूमिकेचे अनेक रंग पाहायला मिळत आहेत. आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी आई कशी बदलते. प्रेक्षकांना या मालिकेचा ट्रेलर खूप आवडला आहे. तो कसा प्रतिसाद देतो हे पाहावे लागेल.

या मालिकेत सुष्मिता सेनसह चंद्रचूड सिंह, सिकंदर खेर, नामित दास आणि इतर कलाकार दिसणार आहेत. याची निर्मिती सोनम कपूर यांच्या ‘नीरजा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राम माधवानी यांनी केली आहे. आर्या १९ जूनपासून डिस्ने हॉटस्टारवर उपलब्ध होईल. तसेच सुष्मिता सेन सुमारे १० वर्षांनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करीत आहेत. ती अखेरच्या वर्षी २०१० मध्ये ‘नो प्रॉब्लम’ चित्रपटात दिसली होती. याशिवाय २०१५ मध्ये तिने बंगाली चित्रपटातही काम केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: