fbpx

ज्योतिरादित्य शिंदे भाजप मध्येही नाराज!

नवी दिल्ली – माजी खासदार आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवरील माहितीतून ‘भाजप’ हा शब्द वगळला आहे. त्याऐवजी त्यांनी स्वत:ची ओळख ही जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी अशी करून दिली आहे. त्यांनी असे केल्याने भाजपमध्येही ज्योतिरादित्य शिंदे नाराज असल्याची चर्चा मध्य प्रदेशातील राजकारणात सुरू झाली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते, त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस सोडण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवरील माहितीमधून ‘काँग्रेस’ शब्द हटवला होता. यामुळेच ज्योतिरादित्य यांनी त्यांच्या ट्विटरवरील माहितीमधून भाजप शब्द हटवल्याने ते आता भाजपमध्येही नाराज आहेत का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. शिंदे यांच्याकडून याबाबत कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाहीये.

शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थकांना शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल आणि त्यांना स्वत:ला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे सांगितले जात होते. मात्र आता दबक्या आवाजात चर्चा अशी सुरू आहे की पोटनिवडणुकांमध्ये शिंदेसमर्थकांची तिकीटे कापली जाणार आहेत. शिंदे यांनी ‘भाजप’ शब्द हटवण्यामागे हे देखील एक कारण असल्याचं बोललं जात आहे. शिंदे यांच्या 22 समर्थकांनी त्यांच्यासोबत भाजपची वाट धरली होती. या सगळ्यांना तिकीट देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र यातल्या अनेक जागांवर भाजपमधील निष्ठावंतांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो अशी भीती भाजपला वाटत आहे असे बोलले जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: