fbpx

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

रायगड, दि. ६ – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज, ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा दिन असून कोरोनाच्या संकटामुळे मात्र हा सोहळा रायगडावर साध्या पद्धतीनेच साजरा करण्यात आला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता सरकारने एकत्र जमण्यास मज्जाव केला असून त्यामुळे कोणीही रायगडावर पोहोचू शकणार नाही. तरीही घरी राहूनच हा सोहळा साजरा करा, असे आवाहना खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केले असून अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला.

६ जून १६६४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. यानिमित्ताने दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी दुर्गराज रायगडावर हे सोहळा संपन्न होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक तसेच शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

दरम्यान, शिवभक्तांनी घरात राहूनच विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक साजरा करावा, स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती खासदारांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: