fbpx

कौन बनेगा करोडपती सेटवर बिग बींना नो एन्ट्री

Unlock 1.0 मध्ये राज्य सरकारने चित्रिकरणाला सशर्त परवानगी दिली असली तरी अमिताभ बच्चन यांना तूर्त चित्रिकरण करता येणार नाही. “कौन बनेगा करोडपती’चे सध्या प्रोमो टीव्हीवर येत आहेत. अमिताभ बच्चन यांनी घरातून हे प्रोमो शूट केले आणि ते टीव्हीवर चालले.

राज्य सरकारने चित्रिकरणाला परवानगी दिल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण या नियम अटींमधल्या एका अटीने मात्र अमिताभ बच्चन यांची गोची केली आहे. म्हणूनच चित्रिकरण करायचं असेल तर बच्चन साहेबांना अजून किमान दोन महिने थांबावे लागणार आहे.

याचे कारण असे की, राज्य सरकारने ज्या नियम अटी घालून दिल्यात त्यात ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञांना चित्रिकरणापासून दूर राहायला सांगितले आहे. कारण करोनाचा संसर्ग ज्येष्ठ व्यक्तींना होण्याचा धोका जास्त प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊन हा नियम बनवण्यात आला आहे.

त्याचमुळे अमिताभ बच्चन यांना “कौन बनेगा करोडपती’चे चित्रिकरण सध्या करता येणार नाही. केवळ अमिताभ बच्चन नव्हे, अनुपम खेर, अन्नू कपूर, नसिरूद्दीन शहा, धर्मेंद्र, शक्ती कपूर, मिथून, पंकज कपूर, जॅकी श्रॉफ, डॅनी, दिलीप ताहिल, राकेश बेदी, कबीर बेदी या कलाकारांना चित्रिकरणापासून वंचित राहावे लागणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: