fbpx
Saturday, December 2, 2023
NATIONAL

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली, दि. ५  – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. या घटनेनंतर दाऊदचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. दाऊदची पत्नी महजबीनही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दसमजते. त्याला आणि त्याची पत्नी यांना कराचीच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या कराचीमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र, पाकिस्तानकडून वारंवार या गोष्टीला नकार दिला जात आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही बातमी पूर्णपणे सत्य आहे आणि दाऊद आणि त्याची पत्नी यांना मिलिटरी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. दाऊद इब्राहिमला कोरोना हा बराच काळ पाकिस्तानात आपल्या कुटूंबासह लपून राहत आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा ठाम पुरावाही भारताने दिला आहे, असे असूनही पाकिस्तान हे मान्य करण्यास नकार देत आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमच्या घरी आता कोरोना विषाणू दाखल झाला आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महजबीन यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दाऊद इब्राहिम आणि पत्नी महजबीन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या घरात काम करणारे सर्व कर्मचारी यांना क्वारंटाईन केले आहेत,

दरम्यान, दाऊद हा १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन आहे. दाऊदच्या पत्नीचे नाव मेहजबीन उर्फ झुबिना जरीन आहे. दाऊद आणि झुबिना यांना चार मुले झाली. महरूख, माहरीन आणि मारिया या तीन मुली तर मोईन नावाचा एक मुलगा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: