fbpx
Monday, September 25, 2023
PUNE

पुणे कॅन्टोन्मेंट – सकाळी 9 ते दुपारी 2 दुकाने उघडण्यास परवानगी द्या, शिवसेनेची मागणी

पुणे, दि. 4 – शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड वार्ड क्रमांक 4 च्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये पुणे कँटोन्मेंट बोर्ड वार्ड क्रमांक 4 मधील भाजी मंडई सुरु झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर आणि प्रशासनावर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही भाजी मंडई इतर हलविण्यात यावी तसेच लोकांचा रोजगार सुरू होऊन त्यांची उपजीविका चालावी व गरजू सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत गरजेच्या वस्तू पोहोचाव्यात याकरिता पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील व्यवसायिक दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत चालू करण्यास परवानगी देण्यात यावी या मागण्या निवेदनात करण्यात आल्या. तसेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर होत चाललेली बिकट परिस्थिती पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली गेल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला गेला आहे याकरिता शिवसेना वार्ड क्रमांक 4 च्या वतीने मा. मुख्यमंत्री आणि बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी वार्ड क्रं. 4 चे विभाग प्रमुख मोहन यादव, शाखा प्रमुख किरण कांबळे,कॅन्टोन्मेंट बोर्ड विभाग प्रमुख अतुल गोंदकर,कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख राजेश शहा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: