fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

मधुकर टिल्लू यांनी एकपात्री कला रुजवली – पुष्कर श्रोत्री

पुणे, दि.३ – एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने स्व. मधुकर टिल्लू यांच्या 20 व्या स्मृतीदिनानिमित्त 20 कलाकारांनी आदरांजली म्हणून ऑनलाईन कार्यक्रम सादर केला. यावेळी बोलताना प्रसिद्ध अभिनेते व एकपात्री कलाकार पुष्कर श्रोत्री म्हणाले , ‘ ज्येष्ठ एकपात्री कलाकार मधुकर टिल्लू यांनी मराठी रंगभूमीवर एकपात्री कला रुजविली व एकपात्रीची नवी पिढी तयार केली. त्यांना 12 तास आपली कला सादर करून एकपात्री कलाकार आदारांजली देत आहेत हे अभिनव आहे.’

या ऑनलाईन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ रंगकर्मी राघवेंद्र कडकोळ, संस्थेचे अध्यक्ष दीपक रेगे, सचिव नरेंद्र लवाटे, उपक्रम प्रमुख मकरंद टिल्लू उपस्थित होते.

यावेळी एकपात्री, कथाकथन, कथा अभिवाचन,शेरी शायरी, पपेट शो, नाट्यप्रवेश, राशींचे किस्से असा विविधरंगी कार्यक्रम सादर करण्यात आला.

दिलीप हल्ल्याळ, मंजिरी धामणकर, भाग्यश्री देशपांडे, मंजुषा जोशी , सुरेंद्र गुजराथी, पल्लवी पाठक, विजयकुमार कोटस्थाने, चैताली माजगावकर भंडारी, विश्वास पटवर्धन, दीपक रेगे, राहुल भालेराव, अंजली शहा, अंजली कऱ्हाडकर, वंदना आचार्य, स्वाती सुरंगळीकर, कल्पना देशपांडे , भावना प्रसादे, चैताली अभ्यंकर आदी कलाकारांनी आपली कला सादर केली.
नरेंद्र लवाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: