fbpx

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे स्थलांतरितांच्या व्यवस्थेची मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

मुंबई, दि. ३ : निसर्ग चक्रीवादळामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून मुंबई शहर जिल्ह्यातील समुद्रालगत राहणाऱ्या सात हजार दोनशे व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले, त्यापैकी तीन हजार नागरिक कुलाबा येथील होते. त्यांची व्यवस्था कुलाबा येथील महापालिकेच्या  शाळेत केली असून तेथील व्यवस्थेची जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर व इतर अधिकारी उपस्थित होते.

मुंबई शहर जिल्ह्यात कोणतीही  जीवितहानी झाली नाही. दक्षता म्हणून शासकीय यंत्रणेने किनाऱ्या लगतच्या नागरिकांचे स्थलांतर केले होते. त्याबरोबरच दहा पथके चक्रीवादळामुळे होणाऱ्या नुकसानी दरम्यान मदत कार्यासाठी सज्ज होती. समुद्रालगत राहणाऱ्या वरळी, माहीम, दादर अशा भागांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. यात ई – विभाग, कोवळा बंदर, मिरा दातार दर्गा, भांडारवडा येथील 1200, जी/उत्तर विभाग, पंजाबी कॉलनी, सायन कोळीवाडा, बंगाली पुरा झोपडपट्टी, सायन, माहिम 1200, एफ/उत्तर विभाग वडाळा, 350, जी/दक्षिण वरळी 250, ए विभाग, गीता नगर,गणेशमूर्ती नगर 3000, डी विभाग, दर्या नगर, शिवाजी नगर, सागर नगर, रामकुंड नगर 1200, अशा 7200 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. कुलाबा येथील महापालिका शाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: