fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

स्कुटर मोटारसायकल रिपेअर्स असोसिएशन कडून ३५० जणांना आपत्कालीन सेवा

पुणे, दि. 2 – कोरोना विषाणू साथीच्या काळात पुणे शहरातील स्कुटर मोटारसायकल रिपेअर्स असोसिएशन कडून ३५० जणांना आपत्कालीन सेवा देण्यात आली. असोसिएशन चे अध्यक्ष हरीश अनगोळकर , उपाध्यक्ष प्रभाकर नायरसचिव संजय काबरा यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

पुणे शहरात सुमारे ३५ वर्षांपासून ही असोसिएशन कार्यरत आहे. कोरोना विषाणू साथीच्या काळात असोसिएशन ने आपत्कालीन सेवेत असणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांच्या दुरुस्तीची घरपोच सेवा दिली. दुकाने बंद असतानाही काही वाहनांना पर्यायी जागेत दुरुस्त करून दिली. सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून असोसिएशन ने सोशल मीडिया मध्ये हेल्पलाईन दूरध्वनी जाहीर केला आणि आलेल्या विनंतीनुसार सेवा उपलब्ध करून दिली. पोलीस ,डॉक्टर ,परिचारिका , सफाई कामगार,बँक कर्मचारी आणि पत्रकारांना या दुरुस्ती सेवा कोणताही अधिकचा मोबदला न घेता नाममात्र मोबदल्यात करून दिल्या. हे काम करताना सोशल डिस्टंसिंग ,कर्फ्यू चे नियम पाळून पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्यात आले.
प्रभाकर नायर ,सचिन पवार ,धनंजय काबरा ,राजेंद्र सुपेकर ,मंदार पानसे ,रमेश इंगळे या सर्वांनी या साठी पुढाकार घेतला. २५ जणांची आपतकालीन टीम तयार करून कोरोना लॉक डाऊन काळात ३५० वाहनांना सेवा देण्यात आल्या. —————- (Media co ordination : Prabodhan Madhyam- News Agency. Deepak Bidkar 9850583518 Gauri Bidkar .)

Leave a Reply

%d bloggers like this: