fbpx

वाहिन्यांनी कोरोना आकडेवारी सादरीकरणात संयम बाळगावा :लोकजनशक्ती पार्टीची विनंती

पुणे, दि. 2 कोरोना विषाणू साथीमध्ये नागरिक मानसिक दडपणाखाली असताना दूर चित्रवाणी वाहिन्यांनी कोरोना आकडेवारी देताना सादरीकरणात संयम बाळगावा,वारंवार तीच माहिती सांगून घबराट निर्माण होईल असे वातावरण तयार करू नये ,अशी विनंती लोकजनशक्ती पार्टीने पत्रकाद्वारे केली आहे.

लोकजनशक्ती पार्टीचे पुणे जिल्हा शहराध्यक्ष संजय आल्हाट आणि प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे यांनी आज पत्रकाद्वारे ही विनन्ती केली. दूर चित्रवाणी वाहिन्यांच्या बातम्या सांगताना त्यात वारंवार कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रसारित केली जाते. त्यामुळे घबराट निर्माण होते. त्याऐवजी वाहिन्यांनी दिवसातून काही ठराविक वेळेस कोरोना आकडेवारी सांगावी आणि उर्वरित वेळेत इतर विषयांना स्थान द्यावे,असे संजय आल्हाट आणि अशोक कांबळे यांनी या पत्रकात म्हटले आहे. सर्वच माध्यमे जबाबदारीने वार्तांकन करीत आहेत ,मात्र वाहिन्यांचा थेट प्रभाव लक्षात घेता त्यांनी अधिक संयमी दृष्टिकोन ठेवावा ,असे या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: