fbpx

#निसर्ग – दोन दिवस घराबाहेर पडू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 2 – कोरोनाच्या संकटासंदर्भात आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज निसर्ग या चक्रीवादळासंदर्भात माहिती देत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचा निर्णय घेतला, पण आपली परीक्षा संपत नाहीये. एकामागून एक संकट येत आहे. आता, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका असून उद्या दुपारपर्यंत अलिबागला हे वादळ येईल. त्यामुळे कुणीही पुढील दोन दिवस घराबाहेर पडायचं नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत

प्रशासन जबाबदारी घेत असून नागरिकांनी प्रशासनाला सहाकार्य करुन सूचनांचं पालन करावं.

सुसाट्याचा वारा आला तरी आपण सुरक्षित राहू शकू, अशा ठिकाणीच थांबण्याचा प्रयत्न करा

पाऊस पडतोय म्हणून शेड किंवा आडोशाला उभा राहून बचावाचा प्रयत्न करू नका

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाच्या वादळाची सद्यस्थिती पाहता आयएमडीने म्हटलं आहे की, पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये तयार झालेला दाबाचा पट्टा मुंबईच्या ५५० किमी, पणजीच्या ३०० किमी, सुरतच्या ७७० किमी दूर आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेत रात्री अडीच वाजता ही माहिती दिली. मंगळवारी हवेच्या दाबाचा पट्टा आणखी वाढणार असल्याने जवळपास १२ तासाच्या आत समुद्रात तीव्र स्वरुपाचं चक्रीवादळ येणार आहे. चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील हरिहरेश्वर, गुजरातमधील दमन यादरम्यान ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: