fbpx
Monday, September 25, 2023
MAHARASHTRA

८२२ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे १२ लाख परप्रांतीय कामगार स्व:गृही परतले

मुंबई, दि.१ – महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्व:गृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एक मे एक जून या महिनाभरात  जवळपास ११ लाख ८६  हजार २१२ परप्रांतीय कामगारांना स्व:गृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ८२२ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४५० बिहारमध्ये १७७, मध्यप्रदेशमध्ये ३४, झारखंडमध्ये ३२, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १७, राजस्थान २०, पश्चिम बंगाल ४७, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ८२२ ट्रेन या सोडण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) मधून १३६, लोकमान्य टिळक टर्मिनल १५४, पनवेल ४५, भिवंडी ११, बोरीवली ७१, कल्याण १४, ठाणे ३७, बांद्रा टर्मिनल ६४, पुणे ७८, कोल्हापूर २५, सातारा १४, औरंगाबाद १२, नागपुर १४  यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून  विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: