fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

कोरोनावर मात करणाऱ्या पोलिसाला सपत्नीक मिळाला रक्तदान शिबिराच्या उदघाटनाचा मान!

पुणे, दि. 1 – कर्तव्यावर असताना कोरोनाचा संसर्ग होऊनही इच्छाशक्तीच्या बळावर जीवघेण्या कोरोनावर मात करणारे पोलीस महेश कामठे आणि त्यांची पत्नी राजश्री कामठे या दांपत्याला रक्तदानशिबिराच्या उदघाटनाचा मान देऊन अखिल शिवाजीनगर गावठाण शिवमहोत्सव समितीने कोरोनावीरांचा सन्मान केला.

कोरोना या जीवघेण्या रोगाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशभरात लॉकडाऊन पाळण्यात येत असला तरी या काळात रक्तसाठ्याची कमतरता मोठ्याप्रमाणावर भासत असल्याने ”लॉकडाऊन”च्या काळातही सर्व खबरदारी घेत रोकडोबा मंदिर, शिवाजीनगर गावठाण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०१ रक्त बाटल्यांचे संकलन झाले.ह्या रक्तदान शिबिरात महिलांनीही उत्स्फुर्तपणे रक्तदान करीत सहभाग घेतला.

यावेळी ड्युटीवर असतानाही वाहतूक पोलीस प्रवीण पासलकर, सचिन धुमाळ या पोलिसांनी रक्तदान करून कर्तव्यावर हजरही झाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी नगरसेवक उदय महाले, बाळासाहेब दाभेकर, ,राजाभाऊ शिरोळे, शिवाजी बहिरट, तानाजी शिरोळे ,सतीश चव्हाण ,प्रशांत जगताप, सचिन मुळीक, सतीश खंडाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.या शिबिरासाठी बाळासाहेब बोडके, प्रशांत धुमाळ, मंदार बहिरट,सौरभ भिलारे, रोहित सांडभोर, सागर दळवी , निलेश इंगवले, सचिन कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: