fbpx
Saturday, December 2, 2023
MAHARASHTRANATIONAL

LOCKDOWN 5.0 -देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला

नवी दिल्ली : मोदी सरकारनं लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठी नवी नियमावली जारी केली असून, यात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 5.0 साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याअंतर्गत कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या ठिकाणांना टप्प्याटप्प्याने सूट दिली जाणार आहे, परंतु सध्या यावर पूर्णपणे बंदी राहील. ही नियमावली 1 जून ते 30 जूनपर्यंत लागू राहील. सध्याचा रात्रीचा कर्फ्यू सुरूच राहणार असून, अत्यावश्यक वस्तूंसाठी कोणताही कर्फ्यू असणार नाही. रात्रीच्या ९ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू राहील. सध्या संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत हा कर्फ्यू आहे

शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सुरू करण्यावर सरकार कालांतरानं निर्णय घेणार आहे. कंटेन्मेंट झोनवगळता इतर भागात धार्मिक स्थळं, हॉटेल्स अन् मॉल ८ जूनपासून सुरू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं, मेट्रो रेल्वे, सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने इत्यादी सुरू करण्यासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

नवीन निर्देश 1 जून 2020पासून अंमलात येतील आणि 30 जून 2020 पर्यंत लागू राहतील. 24 मार्च 2020 नंतर संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स 8 जून 2020 पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली. आरोग्य मंत्रालय यासंदर्भात एसओपी जारी करणार आहे. दुसर्‍या टप्प्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परवानगीनंतर शाळा आणि महाविद्यालये उघडली जाणार आहेत. म्हणजेच शाळा उघडण्याचा निर्णय केंद्रानं राज्यांवर सोपवला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: