टीव्ही अभिनेत्री आणि लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘प्याते हुदगीर हाली लाईफ’ सिझन ४ची विनर असलेली अभिनेत्री मेबीना मायकलचं निधन झालंय. २२ वर्षीय अभिनेत्री मेबीना मायकलचा अपघात नागमंगला तालुक्यातील देवीहल्लीमध्ये झालं. टीव्ही अभिनेत्री आपल्या घरी मदिकेरीला जात होती. तेव्हा मंगळवारी संध्याकाळी हा रस्ते अपघात झाला आणि यात मेबीना मायकलचा मृत्यू झाला.
टीव्ही अभिनेत्री मेबीना मायकलच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. तिच्या अवेळी झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबिय दु:ख सागरात बुडाले आहेत. रिपोर्टनुसार, ज्या कारमध्ये मेबीना मायकल प्रवास करत होती ती कार एका ट्रॅक्टरमध्ये घुसली, जो ट्रॅक्टर टर्न करत होता. पीडितांना लगेच अदीचूंचनागिरी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंस अँड हॉस्पिटलला नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत मेबीनाचा मृत्यू झाला होता. तर या अपघातात मेबीना मायकलसोबत असलेल्या तिचा मित्र बचावला आहे.
कन्नड टीव्ही अभिनेत्री मेबीना मायकलला अपघातात गंभीर दुखापत झाली होती आणि तिचा रक्तस्रावही खूप झाला होता. याच कारणामुळे तिचा हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच मृत्यू झाला. बेलुरू पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रिअॅलिटी शो ‘प्याते हुदगीर हाली लाईफ-४’ चा होस्ट अकुल बालाजीनं मेबीनाच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केलाय. अकुल बालाजीनं आपल्या ट्वीटर अकाऊंटवर लिहिलं, ‘माझी आवडती स्पर्धक आणि शोची विजेती असलेली मेबीनाच्या निधनाची बातमी ऐकून मी शॉक्ड आहे. मेबीनाचं वय खूप कमी होतं आणि तिच्यासमोर अजून तिचं संपूर्ण आयुष्य होतं. या बातमीवर विश्वास ठेवणं कठीण आहे. माझी देवाकडे प्रार्थना आहे की, मेबीनाच्या कुटुंबाला या दु:खद प्रसंगातून सावरण्याची शक्ती मिळो.’
अभिनेत्री मेबीना मायकलनं आपल्या करिअरची सुरूवात एक मॉडेल म्हणून केली होती. तिनं आतापर्यंत अनेक टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं होतं.