fbpx

छत्तीसगड चे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

रायपूर, दि. 29 छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज निधन झाले. २००० ते २००३पर्यंत त्यांनी राज्याची धुरा सांभाळली होती. जोगी हे विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले आहेत. मात्र, ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले होते, त्याच पक्षातून २०१६मध्ये त्यांना आणि त्यांच्या मुलाला बडतर्फ करण्यात आले होते.

वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपुर्वी त्यांची अचानक प्रकृती खालवल्याने त्यांना रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्याच्यावर 21 दिवसांपासून उपचार सुरू होते. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अखेर उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या त्यांचे मुळगाव असलेल्या गोरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राजकारणात येण्यापूर्वी अजित जोगी हे तहसीलदार या पदावर कार्यरत होते. १९८८ च्या जवळपास त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती येण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणूनही काम केलं आहे. छत्तीसगढच्या निर्मितीनंतर त्यांनी २०००- २००३ या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती. २०१६ मध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी जनता काँग्रेस छत्तीसगढ असा आपला पक्ष स्थापन केला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: