fbpx

व्यापारी एकता दिनानिमित्त सेवा देणाऱ्या व्यापारांच सन्मान

पुणे, दि. 26 – २५ मे व्यापारी एकता दिवस म्हणून साजरा केला जातो, या दिनानिमित्त व्यापारी आघाडीच्या वतीने काही व्यापारी यांचा सत्कार बिबवेवाडी प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या हस्ते शाल माळ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.या परसंगी गेले २ महिन्यांपासून करोनाशी लढत सर्व सामान्य ग्राहकांना सतत सेवा देण्याचं काम केलं आहे.आपली जीवाची पर्वा न करता नागरिकांना योग्य ते दरात माल व सेवा देण्याचं काम त्यांनी सतत पार पाडलं त्यामध्ये मेडिकल व भाजीवाल्या पासून ते किराणामालचे व दूध व्यवसाय करणारे अश्या छोट्या मोठ्या व्यापारांचे सन्मान व्यापारी ऐकता दिनानिमित्त करण्यात आले.त्यामध्ये बालाजी किराणा , गजानन भाजी केंद्र,सफल फूड्स,मयुरेश मेडिकल,कोकाटे दुग्धालय,श्रद्धा एंटरप्राइझेस व इतर काही अश्या अनेक विविध क्षेत्र्यातील व्यापारींचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आयुष चोरबेले,मयूर कोठारी राजेंद्र सरदेशपांडे व अनिल भन्साळी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: