fbpx
Thursday, September 28, 2023
MAHARASHTRA

निलेश राणेनी माफी मागावी – प्रकाश आंबेडकर

पुणे दि. २१ – गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. माणूस म्हणून कोणालाही हिनवण्याचा अधिकार नाहीये. तृतीयपंथी देखील माणूस आहेत, त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावे. ऐरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

निलेश राणेने जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी. निलेश राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर यांनी केला असून वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे असल्याचे ही त्यांनी सांगितले.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हिजडा शब्दाचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करून तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखविल्या आहेत. त्याविरोधात 499, 501 अन्वये अब्रूनुकसान आणि मानहानीचा गुन्हा फैजपुर (जळगांव) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासून निलेश राणे व त्यांच्या विरोधी असलेले प्राजक्त तनपुरे यांच्यात सोशल मीडियावर राजकीय वाद चालू आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून तृतीयपंथी समुदायाचा उपहासात्मक पद्धतीने वापर करत समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या.
कोणीतरी ‘हिजडा’ राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा, ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले समोर आले की पिवळी होते साल्यांची, जागा सांग तनपुरे येतो मी. अशा पद्धतीने भाषा वापरत, तृतीयपंथी समुदाय जो की, स्वतःची सांस्कृतिक व सामाजिक ओळख ठेवून आहे व त्याच्या संघर्षा विषयी कुठलीही जाणीव नसलेले व लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले, निलेश राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता बेताल वक्तव्य केले. हे अशोभनीय व तृतीयपंथी समुदायाच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारे असल्याचे तक्रारदार शमीभा पाटील यांनी म्हटले आहे.

2014 च्या दीर्घ अहवालाअंती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र व राज्य सरकारी यांनी तृतीयपंथी अर्थात सांस्कृतिक ओळख हिजडा असलेल्या व्यक्ती वा समुदायाला कायदेशीर अधिकृत अशी लिंग म्हणून तृतीयपंथी मान्यता दिलेली आहे. कुठल्याही लिंग, जातीधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक पद्धतीने त्याच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारा व सामाजिक क्षती पोहोचविणे हा अपराधच आहे. भारतीय दंड विधान 499, 501 नुसार वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या शमिभा पाटील यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी ही माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: