fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

‘पर्सनलाइज्ड मेडिसिन’क्षेत्रात थ्री -डी प्रिंटिंग ची महत्वाची भूमिका:डॉ.शुभीनी सराफ —

थ्री -डी प्रिंटिंग वरील राष्ट्रीय वेबिनार ला चांगला प्रतिसाद 

पुणे : ‘प्रत्येक रुग्णाच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव निर्मिती पासून औषध आणि पोषक घटक निर्मितीपर्यंत ‘पर्सनलाइज्ड मेडिसिन’क्षेत्रात थ्री -डी प्रिंटिंगची महत्वाची भूमिका भविष्यात असेल’,असे प्रतिपादन लखनौच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्सेस विभागाच्या प्रमुख डॉ.शुभीनी सराफ यांनी केले. 

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे ‘कोरोना नंतरच्या जगात थ्री -डी प्रिंटिंग ची गरज’या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये त्या संवाद साधत होत्या. या वेबिनार मध्ये ९० हुन अधिक प्राध्यापक,संशोधक सहभागी झाले.  

डॉ.शुभीनी सराफ म्हणाल्या,’कोरोना नंतरच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत.वैद्यकीय उपकरणे निर्मिती,औषध निर्मिती,बायोलॉजिक्स मध्ये थ्री -डी प्रिंटिंग तंत्राचा उपयोग होणार आहे.शरीरातील ऊती,अवयव निर्मिती,बायो प्रिंटिंग यामध्येही या तंत्राचा उपयोग होणार आहे.फ़ार्मसी तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन करण्याची गरज आहे.कोरोना हे असाधारण स्वरूपाचे संकट आहे.त्याच्याशी लढताना असाधारण गोष्टी लागतील. थ्री-डी प्रिंटींग ही त्यातील एक असाधारण गोष्ट ठरू शकते. 

जगभरात थ्री डी प्रिंटिंग चे सेट अप आहेत आणि कोरोना संदर्भात लागणारे मास्क ,व्हेंटिलेटर ,फेस शिल्ड निर्मिती मध्ये या तंत्राचे योगदान पुढे येत आहे. या तंत्राच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या गोष्टींचे प्रोटोटाइप करून पुढे त्याच्या चाचण्या घेऊन उत्पादन करता येणे शक्य आहे,असेही त्या म्हणाल्या. या वेबिनारचे संयोजन  कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ किरण भिसे,डॉ कांचन चव्हाण,डॉ राणी पोटावळे,अमृता यादव आणि रजत सय्यद यांनी केले. हा वेबिनार १५ मे रोजी झाला.  

Leave a Reply

%d bloggers like this: