fbpx
Friday, December 8, 2023
MAHARASHTRAPUNE

लॉकडाऊनच्या काळात मोटार ड्रायव्हिंग स्कुल संचालक घेताहेत रस्ता सुरक्षेचे ऑनलाईन धडे

पुणे – लॉकडाऊन म्हणजे फक्त अडचण आहे असे नाही तर एक संधी सुद्धा आहे. या वेळेचा सदुपयोग कसं करायला हवा याचा मार्ग मोटार ड्रायव्हीग स्कूल संचालक घालून देत आहेत. देशव्यापी लॉकडाऊन मध्ये रस्ता अपघात प्रमाण हे शुन्य झाले असून हीच परिस्थिती लॉकडाऊन संपल्यानंतर असायला पाहिजे, एक आदर्श चालक घडावा व रस्ता सुरक्षा बळकट व्हावी या करिता वाहन प्रशिक्षक संचालक मंडळी ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत. ऑनलाईन पद्धतीचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे.

कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे व देवाराम बांडे सर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे समन्वय महेश ड्रायव्हिंग स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक महेश शिळीमकर करत असून राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कुल संचालक यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे.

अमित खत्री, विनायक जोशी, डॉ दिग्विजय पवार, इन्शुरन्स इंव्हीकेटर मिलिंद शिंदे यांच्या अभ्यासातून, अनुभवातून हे प्रशिक्षण सुरू आहे. रस्ता सुरक्षा व विद्यार्थ्यांना ड्रायव्हिंग शिकवीत असताना त्यांना काय काय शिकविणे गरजेचे आहे?, वाहन चालविणे सोपे आहे पण वाहन चालविताना वाहतुकीचे नियम सुद्धा माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे. वाहन चालक हे दोन प्रकारचे असतात ड्रायव्हिंग स्कूल मध्ये शिकलेला चालक आणि घरगुती शिकलेला चालक. या दोहामधील वाहन चालविणे मधील खूप मोठी तफावत आपणाला जाणवतील. देशात होणाऱ्या अपघाताबद्दलच्या तांत्रिक बाबी अतिशय सोप्या पद्धतीने संचालकांना समजावून सांगत आहेत. वाहन चालकाच्या चुकीने झालेले अपघाताचे कारण शोधून त्यात दुरुस्ती करण्यास संबंधित चर्चा केली जात आहे.

या विषयी बोलताना महेश शिळीमकर म्हणाले, वाहन चालक व मालक प्रशिक्षक यांना प्रशिक्षण देऊन रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती व्हावी अपघात मुक्त भारत हा या उपक्रमाचा हेतु आहे.. लॉक डाऊन संपल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे प्रशिक्षण चालू ठेवता येईल यावरही विचारविनिमयचालू आहे. रस्ता सुरक्षेविषयी अभ्यासू व्यक्तींना संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षकांना अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेता येईल. सहभागी झालेल्या ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून राज्यातील सर्वच ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन आम्ही करत आहोत.

One thought on “लॉकडाऊनच्या काळात मोटार ड्रायव्हिंग स्कुल संचालक घेताहेत रस्ता सुरक्षेचे ऑनलाईन धडे

  • Mrs.Meghana Amar Kadiyal.

    All sessions are much more informative,helffull to all people’s like road safety, about insurance,laws of the motor vehicle penalties,business development, personality development for the owners and for instructor, how we can use a creative material in our office, how to Maintain cyllabus, many more things to be got study, we all have to work on it, we are really gain a lots off knowledge by this activity, a big thanks to sasane sir, bande sir, Mahesh sir, Amit sir, vinayak Joshi sir, milind sir and pawar sir. Thanks alot.

    Reply

Leave a Reply

%d