fbpx

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल तर्फे शहराच्या विविध भागात  वैद्यकीय शिबीर 


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल तर्फे शहराच्या  विविध भागात सोमवारी  वैद्यकीय शिबीरे आयोजित करण्यात आली. जनता वसाहत,वडगाव शेरी चंदन नगर,धनकवडी ,बीटी कवडे रोड   या ठिकाणी झालेल्या वैद्यकीय शिबिरांमध्ये १३४० जणांची तपासणी करून  वैद्यकीय मदत देण्यात आली. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक रित्या ‘डॉक्टर तुमच्या दारी’ या अभियानाचे उदघाटन केले होते. त्यानंतर शहराच्या कंटेनमेंट क्षेत्रासह विविध ठिकाणी वैद्यकीय शिबिरे सुरु आहेत. महिनाभर चालणाऱ्या या अभियानात सहभागी होण्यासाठी १५० डॉक्टर्सनी नोंदणी केली आहे,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल चे पुणे शहर अध्यक्ष डॉ सुनील जगताप यांनी दिली.        

राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे  प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र  काळे ,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शना खाली   ‘डॉक्टर आपल्या दारी’ अभियानासाठी पुणे शहरातील विविध कंटेन्मेंट भागात  ५ ऍम्ब्युलन्स ,थर्मल गनस् ,पीपीई किट्स व औषधे घेऊन एनसीपी कोव्हीड वारीअर्सची डॉक्टर्स टीम कार्यरत होती.

जनता हॉल जनता वसाहत येथे प्रिया गदादे पाटील, नगरसेविका, पुणे मनपा यांच्या समन्वयाने डॉ. रणजित निकम, डॉ शलेंद्र माने, डॉ शैलेश पोटे,डॉ काकासाहेब ढेरे, डॉ संतोष खेडकर, डॉ.उरसळ यांनी सोशल डिस्टन्सिंग वगैरे सर्व निकषांची पूर्तता करत शिस्तबद्ध रीतीने जवळपास ४५० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले. तसेच राम मंदिर – जनता वसाहत पर्वती येथे शिवाजी गदादे पाटील, प्रेमराज गदादे पाटील यांच्या मदतीने डॉ.नितीन भोईटे, डॉ विजयसिंह देसाई,डॉ.चंद्रशेखर जावळकर,डॉ.सचिन ढमाले यांनी तपासणी केली.

शिवाजी चौक मेडीपॉइंट हॉस्पिटल लेन ,वडगाव शेरी चंदन नगर येथे डॉ. राजश्री पोखरणा,डॉ. पल्लवी पाठक, डॉ.दत्तात्रय गायकवाड, डॉ.भाऊसाहेब जाधव, डॉ.हरिभाऊ उंडे, डॉ.रितेश दुग्गड, डॉ. परशुराम सुर्यवंशी आदी डॉक्टरांनी जवळपास २६० रुग्णांची तपासणी करून औषधी वाटप केले. नगरसेवक महेंद्र पठारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

गुलाब नगर भागात शरद पवार बहु उद्देशीय भवन जवळ धनकवडी येथे डॉ.सौ. ज्योती हेमंत तुसे, डॉ.सौ.संगीता माने, डॉ.अनुपमा गायकवाड, डॉ.सौ.दिपाली वाघ, डॉ.सौ.मंजिरी पवार जगताप इत्यादी महिला डॉक्टरांनी नगरसेविका सौ. अश्विनी भागवत संतोष  फरांदे व त्यांच्या  कार्यकर्त्यांच्या मदतीने साधारणतः २८० रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले.

तसेच कॅन्टोन्मेंट भागात बीटी कवडे रोड येथे डॉ.सुहास लोंढे, डॉ.शंतनु जगदाळे, डॉ.विक्रम सुपागडे, डॉ.अमर मिसाळ आदी डॉक्टरांनी ३५० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून औषध वाटप केले व माजी नगरसेविका सुरेखा कवडे आणि सहकाऱ्यांनी शिबिरासाठी मदत केली. शिबिरासाठी विरोधीपक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, आमदार चेतन तुपे, आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी  रुबल अग्रवाल, अंजली साबणे, वैशाली जाधव आदी पदाधिकारी, श्सुहास उभे व त्यांचे सहकारी, डॉक्टर सेलच्या डॉ संगीता खेनट, डॉ अजितसिंह पाटील, डॉ हेमंत तुसे, डॉ राहुल सूर्यवंशी, डॉ तुषार वाघ आदी सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

%d bloggers like this: