शालेय शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा
पुणे, दि. १५ – रोटरी क्लब पुणे पोर्टसाईट आणि इंडियन करियर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल या प्रशालेतील शिक्षकांसाठी ‘टीचर प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम कन्फर्मेशन’ या विषयांतर्गत दिनांक १३,१४,१५ जुलै २०२० रोजी ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली गेली.

या कार्यशाळेत प्रशालेतील सर्व शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षक कशा प्रकारे हातभार लावू शकतात याचे सुसंगत विवेचन या कार्यशाळेत करण्यात आले.
त्याचबरोबर शिक्षकांसाठी अध्यापन उत्कृष्ट होण्यासाठी काय प्रयोग ,कृती करता येईल याचीही माहिती देण्यात आली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही ऑनलाईन कार्यशाळा पार पडली.
शबाना शेख यांनी संयोजन केले. याप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्य परवीन शेख यांनी सर्व प्रशिक्षक यांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी व संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांचे सहकार्य लाभले.
