Saturday, October 24, 2026
PUNE

पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 15 :- पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 196 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.15 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील 42 हजार 846 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 26 हजार 623 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 78 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 424 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.14 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 11 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 724, सातारा जिल्ह्यात 106, सोलापूर जिल्ह्यात 69, सांगली जिल्ह्यात 27 तर कोल्हापूर जिल्ह्यात 85 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 1 हजार 949 रुग्ण असून 1 हजार 108 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 775आहे. कोरोनाबाधित एकूण 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 305 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 422 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 535 आहे. कोरोना बाधित एकूण 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 698 रुग्ण असून 372 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 305 आहे. कोरोना बाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 400 कोरोना बाधीत रुग्ण असून 865 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 503 आहे. कोरोना बाधित एकूण 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 57 हजार 428 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 52 हजार 541 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 887 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 841 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 51 हजार 198 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading