Monday, June 22, 2026
MAHARASHTRA

12 वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता

पुणे, दि. 15 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या (16 जुलै ) जाहीर होणार आहे. यंदा कोरोना संकटकाळात राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यास उशिर झाला आहे. मात्र मंडळाने यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांचा निकाल लावण्याचा प्रयत्न होता. त्यानुुसार आज मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 16 जुलै दिवशी दुपारी एक वाजता हा निकाल अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येणार आहे.

12 वीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल ?
mahresult.nic.in ही वेबसाईट ओपन करा.
अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल. त्यानंतर HSC Examination Result 2020 वर क्लिक करा. आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडिरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर आणि आईचं नाव टाईप करायचं आहे. त्यापुढे View Result वर क्लिक करा. तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल. तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.

निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स
mahresult.nic.in,
maharashtraeducation.com
results.mkcl.org
mahahsscboard.maharashtra.gov.in,
mahahsscboard.in

मागील वर्षी बारावीचा निकाल 28 मे 2019 दिवशी लागला होता. यंदा राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान सारे पेपर सुरळीत पार पडले आहेत. शिक्षण मंडळाने ऑगस्ट 2019 मध्ये जाहीर केलेल्या नियामांनुसार यंदा 12 वी परीक्षा 650 ऐवजी 600 गुणांची घेतली जाणार आहे. हा नवा नियम शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावी साठी लागू करण्यात येईल. सध्या हे अतिरिक्त 50 गुण पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येत आहेत. दरम्यान यंदा बारावीची परीक्षेला सामोरे जाणार्‍यांची संख्या 15 लाख 5 हजार 27 इतकी आहे. दरम्यान यामध्ये 8,43,553 मुलं तर 6,61,325 मुलींचा समावेश असून राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading