Sunday, June 21, 2026
PUNE

रंगभूमी सेवक संघाच्या पडद्यामागील कलाकारांना धान्याची कीटचे वाटप

पुणे, दि. 28 – पुण्यातील पालवी फाऊंडेशन, वंदे मातरम संघटना आणि लायन्स क्लब कोथरूड यांच्या वतीने रंगभूमी सेवक संघाच्या पन्नास पडद्यामागील कलाकारांना धान्याची कीटचे वाटप करण्यात आले यावेळी पालवी फाऊंडेशनचे पदाधिकारी, लायन्स क्लब कोथरूड चे प्रेसिडेंट शास्त्री आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष आणि संवाद पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते शास्त्री यांच्या हस्ते पडद्यामागील रंगकर्मींना शीधा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेन्द्र गोखले, कार्याध्यक्ष अरुण पोमण, उपाध्यक्ष दत्तात्रेय शिंदे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रंगभूमी सेवक संघाच्यावतीने सुनील महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading