आर्थिक साक्षरतेवर कौशल्य विकास कार्यक्रमाचे सीए इन्स्टिट्यूटतर्फे आयोजन
पुणे, दि. २७ – दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने आर्थिक साक्षरतेवर कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सीए स्थपना दिवसाच्या निमीत्ताने दि. २९ जून ते ४ जुलै २०२० या कालावधीत रोज सकाळी १० ते १२ या वेळेत विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम http://www.youtube.com/puneicaiofficial यावरुन लाईव्ह प्रसारित होणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी दिली.

सीए अभिषेक धामणे म्हणाले, “सीए सभासदांमध्ये आर्थिक साक्षरतेविषयी कौशल्य्य विकसित व्हावीत या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे. सोमवार, दि. २९ जून रोजी ‘कांसेप्ट ऑफ़ अकाउंटिंग’वर सीए सुरेश मेहता, मंगळवार, दि. ३० जून रोजी ‘बँकिंग अँड फायनान्स’वर सीए किरण कुंटे, बुधवार, दि. १ जुलै रोजी ‘ऑडिटिंग’वर सीए कुसाई गोवावाला,
गुरुवार, दि. २ जुलै रोजी ‘इनकम टैक्स’वर सीए मेहुल शाह, शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी ‘बेसिक कांसेप्ट ऑफ़ जीएसटी’वर सीए वैशाली खर्डे, तर शनिवार, दि. ४ जुलै रोजी ‘बिज़नेस कम्यूनिकेशन अँड कमर्शियल लॉ’वर सीए तिकम रोहिडा मार्गदर्शन करणार आहेत.”
हा कार्यक्रम विनामूल्य असून, विद्यार्थ्यांना पुर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणी https://bit.ly/2Ns8IpV यावर करावी, असे आवाहन ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए समीर लड्ढा, सचिव सीए काशिनाथ पठारे यांनी केले आहे.
