fbpx
Saturday, May 11, 2024

बिल्ट टू ऑर्डर

BusinessLatest News

टीव्हीएस मोटर कंपनीचा  टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ प्लॅटफॉर्म

होसूर : दुचाकी व तीनचाकी वाहनांची उत्पादक, जागतिक पातळीवरील विख्यात कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने आज टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ (बीटीओ) प्लॅटफॉर्म सुरु करून फॅक्टरी कस्टमायझेशन आणि पर्सनलायझेशन प्लॅटफॉर्म क्षेत्रात पदार्पण केले आहे. नवीन बिझनेस व्हर्टिकल टीव्हीएस बीटीओ प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना टीव्हीएसच्या गाड्या खरेदी करताना कस्टमाइज करून त्यांना व्यक्तिगत स्वरूप देता येणार आहे, ग्राहकांनी नोंदवलेल्या आवश्यकतांप्रमाणे थेट फॅक्टरीमधून गाडी तयार होऊन येईल. आपल्या उत्पादन विभागांमध्ये सर्वोत्तम श्रेणीचे तंत्रज्ञान आणि श्रेणीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध करवून देण्याची कंपनीची वचनबद्धता यामुळे आता अधिकच दृढ होणार आहे. टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ (बीटीओ) प्लॅटफॉर्मवर दाखल होणारी पहिली गाडी टीव्हीएस मोटर कंपनीची प्रमुख मानली जाणारी टीव्हीएस अपाचे आरआर ३१० असणार आहे.  प्री-सेट किट्स, ग्राफिक पर्याय, रिम कलर पर्याय यांबरोबरीनेच व्यक्तिगत रेस नंबर्स देखील ग्राहक निवडू शकतात. डायनामिक आणि रेस अशी नावे असलेल्या या किट्समध्ये अनेक वेगवेगळ्या अनोख्या व आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे ग्राहकांच्या गरजा व ते गाडीचा वापर कशाप्रकारे करणार आहेत त्यानुसार गाडीची कामगिरी अधिक वाढवता येते, तसेच ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार स्टायलिंग देखील करता येते. टीव्हीएस मोटर कंपनीच्या पोर्टफोलिओतील इतर गाड्यांसाठी देखील हा प्लॅटफॉर्म टप्प्याटप्प्याने उपलब्ध करवून दिला जाईल. टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ (बीटीओ) प्लॅटफॉर्म सुरु करण्यात येत असल्याबद्दल टीव्हीएस मोटर कंपनीचे हेड – (मार्केटिंग) प्रीमियम मोटरसायकल्स, मेघश्याम दिघोळे यांनी सांगितले, “आमचे नवे बिझनेस व्हर्टिकल टीव्हीएस ‘बिल्ट टू ऑर्डर’ (बीटीओ) सुरु होत असल्याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  हा आमचा पहिला फॅक्टरी कस्टमाइजपर्सनलाईज प्लॅटफॉर्म आहे.  प्रत्येक ग्राहकाची रायडिंगची स्टाईल आणि अभिव्यक्ती वेगवेगळी व अनोखी असते. या प्लॅटफॉर्ममुळे आता आमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार आपल्या गाड्या कस्टमाइज व पर्सनलाईज करून घेता येणार आहेत.  सुपर प्रीमियम टीव्हीएस अपाचे आरआर ३१० बीटीओ ही टीव्हीएस बीटीओवर दाखल करण्यात येणार असलेली पहिली गाडी असेल, ग्राहकांच्या आवश्यकतांनुसार गाड्या थेट फॅक्टरीमध्ये कस्टमाइज व तयार केल्या जातील.  रेसिंग गाड्या निर्मितीला चार दशके पूर्ण होत असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी टीव्हीएस मोटर एक विशेष ‘रेस रिप्लिका’ ग्राफिक देखील उपलब्ध करवून देत आहे.

Read More