मानसिक तणावाखाली असलेल्या तरुण पिढीसाठी शिवछत्रपतींचा इतिहास प्रेरणादायी – शिवेन्द्रसिंहराजे भोसले
कार्यक्रमास शिवसृष्टीचे विश्वस्त विनीत कुबेर, अमृत पुरंदरे, सुनील मुतालिक, सल्लागार मनोज पोचट व संदीप जाधव, अभिनेते अजय पुरकर, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार व रुचा लिमये उपस्थित होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालकपदी प्रसेनजीत फडणवीस यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसृष्टीची माहिती जनमानसात पोहोचावी या दृष्टीने सामाज माध्यमांमध्ये सक्रीय इन्फ़्लुएन्सर असणाऱ्या व्यक्तींसाठी एक विशेष स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना शिवेन्द्
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या शिवसृष्टीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनमानसापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे हे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी आपल्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बाबासाहेब पुरंदरे यांना शिवशाहीर ही उपाधी आपल्या आजी सुमित्रा राजे भोसले यांनी दिली ही आठवण देखील त्यांनी आवर्जून सांगितली. इतिहास हा केवळ प्रेरणा देणारा नसून व्यक्तीचे विचार, दृष्टिकोन आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणारा आहे असे स्पष्ट मत देखील यावेळी भोसले यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील संघर्ष, आग्रा येथून सुटका, मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी झालेला तह आणि प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्य उभे करण्याचा इतिहास हा आजच्या तरुणांसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या तरुणांमध्ये वाढणाऱ्या नैराश्य, तणाव आणि आव्हानांवर मात करण्यासाठी छत्रपतींच्या जीवनातून आत्मविश्वास, धैर्य आणि चिकाटी शिकण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सन्मानाविषयी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीसन्मानाचा आदर्श इतिहास घडविल्याचे सांगून, आजच्या समाजातही त्या मूल्यांचे पालन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी शिवसृष्टी आयोजित समाजमाध्यम स्पर्धेतील राज्यभरातील स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. पुण्यासह यवतमाळ, चंद्रपूर आणि राज्यातील विविध भागांतील स्पर्धकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल भोसले त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना मनोज पोचट म्हणाले की, शिवसृष्टी विषयी माहिती जनमानसात पोहोचावी म्हणून समाजमाध्यमांवर सक्रीय इन्फ़्लुएन्सर असणाऱ्या व्यक्तींसाठी एक विशेष स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये ५०० हून अधिक इन्फ़्लुएन्सर सहभाग घेतला होता. या उपक्रमामुळे शिवसृष्टीच्या इंस्टाग्राम पेजला समाजमाध्यमांवर असणारे व्ह्यूज १.३ दशलक्ष हून ४.० दशलक्ष पर्यंत पोहचले. या उपक्रमाच्या समन्वयक म्हणून ऋचा लिमये यांनी काम पहिले.
अभय भुतडा फाउंडेशच्या सहकार्यामुळे महिला व १८ वर्षाखालील मुलामुलींसाठी दिनांक १ मे ते २७ जून २०२६ या काळात शिवसृष्टी विनामूल्य पाहता आली. या संधीचा लाभ घेवून सुमारे १ लाख शिवप्रेमींनी शिवसृष्टीस भेट दिली, अशी माहिती पोचट यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अजित आपटे यांनी केले.
