Saturday, April 25, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

तब्बल २५ लक्ष मोग-यासह सुवासिक फुलांनी सजले महालक्ष्मी मंदिर

पुणे : मोग-याच्या २५ लक्ष सुवासिक फुलांचा गंध अनुभवित श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवीला परिधान केलेला मोग-याचा पुष्पपोशाख पाहण्याकरता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोग-याच्या फुलांची सजावट अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने करण्यात आली होती.

निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने मोगरा महोत्सवाचे. यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त तृप्ती अग्रवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही सजावट करण्यात आली. मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. मंदिराचा गाभारा व सभामंडपात विविधरंगी फुलांची आरास करण्यात आली.

तब्बल १०० किलो मोगरा, गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, तगर, झेंडू, कार्नेशियन, आॅर्किड यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली.  श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीसमोर नैवेद्य देखील दाखविण्यात आला. फुलांची आरास पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. ही आरास सोमवार, दि. २० एप्रिल पर्यंत पाहण्यासाठी खुली असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading