मुलीला सक्षम बनवण्यासाठी बापाने घेतली परीक्षा – शंतनु मोघे
कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरारक अॅक्शन ट्रॅक पाहायला मिळत आहे. मोहिनी आणि तिचे वडील महेंद्र (शंतनू मोघे) यांच्यातील झालेले फाईट सीक्वेन्स हे केवळ अॅक्शनपुरते मर्यादित न राहता नात्यांमधील संघर्ष, भावना आणि एक बाप आपल्या मुलीला सक्षम बनवण्याचा प्रयत्न याचे प्रभावी चित्रण करत आहेत. या सीनमुळे मालिकेची रंगत अधिकच वाढली असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मोहिनी पात्र साकारणारी अनघा ठाकूर म्हणाली, “शंतनू सरांनी मला खूप मदत केली, खूप टिप्स दिल्या. काही गोष्टी मी त्यांच्याकाडून बघून शिकले आहे आणि काही गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. खूप महत्वाच्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या ज्या मला इतर कुणाकडून शिकता आल्या नसत्या. Fight Sequence करत असताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी ज्याने स्वतःला आणि समोरच्याला हानी होणार नाही हे सांगितले. माझा अनुभव खूपचं कमाल आहे. पहिले खूप भीती वाटत होती दडपण आले होते कारण मी असं पहिले कधीच केले नव्हते. पण, action डायरेक्टर यांनी आणि त्यांच्यसबोत असलेल्या असिस्टंट यांनी मला छान समाजवाल. आणि मी डान्सर असल्याने मी त्याचा एक रिदम बसवला.”
महेंद्र म्हणजेच शंतनू मोघे म्हणाले, “एक अभिनेता म्हणून बोलायचे झाले तर असे ऍक्शन सीन खूप थ्रिलिंग असतात कारण यात stunts असतात… पण एक माणूस म्हणून सुजाण प्रेक्षक म्हणून असे सीन मला अवडतात कारण यात एक बाप आपल्या मुलीची परीक्षा घेताना दिसतो. पालकत्वात आपल्या मुलाला तुम्ही कसे सर्वोतपरी परिपक्व बनवता जगाशी भिडण्यासाठी हे अश्या सीनमधून आमच्या मालिकेत अधोरेखित केले जात आहे . माझी आणि अनघाची केमेस्ट्री खूपच छान आहे. अनघा खूप गोड मुलगी आहे. ती डान्सर आहे त्यामुळे ती एक्सप्रेसिव्ह आहे खूप भोळी आहे, आणि मनमोकळी आहे. ती सगळं छान शिकून घेते. stunts करणं हा specialised जॉब आहे. त्यामुळे प्रेक्षक जे बघतात त्यांनी अजिबात घरी अश्याप्रकारचे stunt करू नये कारण त्यामागे अथक परिश्रम असतात. हे सिन प्रचंड अवघड असतात. मी स्वतः खूप काळजी घेतो रेग्युलर जिमला जातो, डाएट शक्य तितकं पाळतो. बॉडी बिल्डिंग साठीच नाही तर सर्वार्थाने दोन गोष्टी आवश्यक असतात आणि त्या म्हणजे डेडिकेशन आणि डिसिप्लिन. पण overall ताब्यतेसाठी आणि ऍथलेटिक फिजिकसाठी फक्त जिम असे नाही स्विमिंग, running तसेच high इंटेन्सिटी ट्रैनिंग देखील पर्याय आहे.”
एकंदरीत, ‘मोहिनी’ मालिकेतील हा अॅक्शन ट्रॅक प्रेक्षकांना केवळ थरार देत नाही तर नात्यांमधील सूक्ष्म भावनाही प्रभावीपणे मांडतो. दमदार अॅक्शन, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि भावनिक गुंफण यामुळे हा ट्रॅक सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
