Sunday, September 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

प्रशांत जगताप यांचा कॉँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज दादर येथील टिळक भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षबदलामुळे स्थानिक राजकारणात उल्लेखनीय बदल होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाबरोबर मर्यादित स्वरूपाची युती करण्यासही जगताप यांनी सुरुवातीपासून कडवा विरोध केला होता. तरीही पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जगताप यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

एकीकडे आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करत असताना ते धोक्यात आणणाऱ्यांना साथ देणाऱ्या अजित पवार यांच्या बरोबर आपण जाणे ही विचारांशी आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांशी प्रतारणा आहे, असा जगताप यांचा आक्षेप आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे कधीही स्थानिक राजकारणात लक्ष घालत नाहीत. ते राष्ट्रीय स्तरावर लोकनेते आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या बरोबर जाण्याच्या निर्णयात त्यांचा काही संबंध असल्याचे वाटत नाही, असा दावा त्यांनी केला. शरद पवार हे आपले आजही श्रद्धास्थान आहेत. सुप्रिया सुळे आपल्या मार्गदर्शक आहेत. अजित पवार यांच्याशीही आपले व्यक्तिगत वैर नाही, असेही जगताप यान यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading