द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडकडून गोल्ड ईटीएफचे लाँचिंग, सोन्यामधील गुंतवणुकीचा स्मार्ट पर्याय
मुंबई : पॅन्टोमॅथ ग्रुपची एक कंपनी असलेल्या ‘द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड’ने आज ‘द वेल्थ कंपनी गोल्ड ईटीएफ’ सुरू करण्याची घोषणा केली, जी सोन्याच्या देशांतर्गत किमतीचा मागोवा घेणारी एक ओपन-एंडेड योजना आहे. ही नवीन फंड ऑफर (NFO) 16 ते 22 डिसेंबर 2025 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुली राहील. गुंतवणूकदारांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा एक आधुनिक, कार्यक्षम आणि सुरक्षित मार्ग प्रदान करण्यासाठी हा फंड तयार करण्यात आला आहे.
वेल्थ कंपनी गोल्ड ईटीएफ प्रामुख्याने 99.5% किंवा त्याहून अधिक शुद्ध भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करेल, जे लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या (LBMA) ‘गुड डीलिव्हरी’ मानकांनुसार असेल. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) या दोन्ही ठिकाणी हा ईटीएफ सूचीबद्ध केला जाईल, ज्यामुळे देशभरातील गुंतवणूकदारांना यात प्रवेश करणे सोयीचे होईलच पण खरेदी-विक्रीची सोय उपलब्ध होईल.
प्रत्यक्षात सोने ताब्यात ठेवण्यापेक्षा, गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून वेल्थ कंपनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा अधिक सक्षम आणि पारदर्शक मार्ग प्रदान करतो. या ईटीएफद्वारे 99.5% किंवा त्याहून अधिक शुद्धतेच्या सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते. परिणामी, प्रत्यक्षात सोने खरेदी करताना केली जाणारी पडताळणी आणि गुणवत्तेच्या चिंता राहात नाहीत. फिजिकल सोन्याच्या तुलनेत ईटीएफची किंमत पूर्णपणे पारदर्शक असते. प्रत्यक्षातील सोने खरेदी करताना त्यावर सामान्यतः स्थानिक प्रीमियम आणि घडणावळीचे शुल्क लागते. ईटीएफमध्ये याची काही अडचण नाही. शिवाय ईटीएफची किंमत खर्चापूर्वी थेट बाजारातील किमतींशी जोडलेली असते. याची तरलता लक्षणीय आहे. कारण स्टॉक एक्स्चेंजवर ईटीएफची सहजपणे खरेदी – विक्री होऊ शकते. तर फिजिकल सोन्यासाठी खरेदीदार शोधणे आणि किमतींची घासाघीस करणे गरजेचे असते. ईटीएफमुळे गुंतवणूकदार साठवणूक आणि सुरक्षेच्या आव्हानांपासून वाचतात, तर फिजिकल सोन्यासाठी सुरक्षित साठवणूक आणि संबंधित खर्च आवश्यक असतो. खर्चाच्या दृष्टिकोनातूनही ईटीएफ फायदेशीर आहे. ईटीएफमध्ये कमी खर्च गुणोत्तर असते आणि त्यात घडणावळीचे शुल्क वगैरेचा समावेश नसतो. याव्यतिरिक्त, छोट्या छोट्या रकमेच्या साहाय्याने गुंतवणूक करता येते. ज्यामुळे सोन्यातील गुंतवणूक फिजिकल सोन्याच्या तुलनेत अधिक लवचिक आणि सुलभ होते, ज्यासाठी काहीवेळा किमान खरेदीची अट असते.
या लाँच प्रसंगी द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडच्या संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधू लुनावत म्हणाल्या, “सोन्याचे दागिने खरेदी करणे म्हणजे उत्तम गुंतवणूक आहे, असे कायमच आपल्याला सांगितले जाते. पण खरी गोष्ट अशी आहे की, जेव्हा तुम्ही हार खरेदी करता, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करत नसता तर तुम्ही खरेदी करत असता. तुम्ही कारागिराच्या कौशल्यासाठी आणि सुंदर वस्तू घालण्याच्या तुमच्या हौसेसाठी पैसे देत असता. यात खूप मोठा फरक आहे. जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये खरोखरच सोन्याचा समावेश करायचा असेल, तर दागिन्यांच्या ग्राहकांसारखा विचार करणे थांबवा आणि गुंतवणूकदारासारखा विचार करायला सुरुवात करा. आणि इथेच गोल्ड ईटीएफचे काम सुरू होते. ते तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त किमतीशिवाय, आपल्या आवडीसाठी एवढे पैसे खर्च केले, या भावनिक ओझ्याशिवाय आणि कोणत्याही नुकसानशिवाय शुद्ध सोन्याचा लाभ देतात.”
लुनावत यांचाच मुद्दा पुढे नेत, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडचे मुख्य धोरणात्मक अधिकारी श्री. देबाशिष मोहंती म्हणाले, “अस्थिर आणि अनिश्चित परिस्थितीत, सोने हा भारतीय गुंतवणुकीचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. द वेल्थ कंपनी गोल्ड ईटीएफद्वारे, आम्ही अचूकता, तरलता आणि गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह असे उत्पादन देत आहोत. किरकोळ खरेदीदारांपासून ते सुजाण गुंतवणूकदारांपर्यंत, बाजारातील प्रत्येक घटकासाठी सोन्यातील गुंतवणूक अधिक सोपी, कार्यक्षम आणि धोरणात्मकदृष्ट्या मजबूत करणे हे आमचे ध्येय आहे.”
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार, घसरणारे उत्पन्न, वाढलेला भू-राजकीय तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे होणारा तीव्र ओढा यामुळे सोन्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. परिणामी, सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल. या परिस्थितीनुसार, 2026 मध्ये सोन्याच्या किमती सध्याच्या तुलनेत 15% ते 30% पर्यंत वाढू शकतात. यासाठी गुंतवणुकीत होणारी वाढ, विशेषतः गोल्ड ईटीएफद्वारे होणारी गुंतवणूक, हा एक प्रमुख कारणीभूत घटक असेल. जो दागिने किंवा तंत्रज्ञान यांसारख्या बाजारातील इतर क्षेत्रांमधील कमकुवतपणावरील तोडगा असेल.
