Sunday, September 13, 2026
Latest NewsPUNE

कलांगण वाटिका उपक्रमाचे १९ व २० डिसेंबर रोजी आयोजन


पुणे, दि. १६ डिसेंबर, २०२५ : 
भारतीय शास्त्रीय संगीत घराघरापर्यंत पोहोचावे या उद्देशाने पुण्यातील प्रतीक राजकुमार यांच्या ‘साउंडस ऑफ बीट्स’ या संस्थेच्या वतीने ‘कलांगण वाटिका’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले असून या अंतर्गत येत्या शुक्रवार १९ व शनिवार २० डिसेंबर या दोन दिवशी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यातील पहिला कार्यक्रम शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी हिंजवडी येथील यशवन मान या ठिकाणी सायं ६ वाजता संपन्न होईल तर दुसरा कार्यक्रम शनिवार दि. २० डिसेंबर रोजी खराडी येथील यशविनमधील ओरीझोन्टे या ठिकाणी सायं. ६ वाजता संपन्न होईल.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना प्रतीक राजकुमार म्हणाले, “सध्याच्या धावपळीच्या जीवनात संगीत सभांना जाणे नागरिकांना तितकेसे शक्य नसताना कलाकारांना आणि पर्यायाने शास्त्रीय संगीताला घरा घरांत पोहोचविण्याच्या दृष्टीने सोसायटी पातळीवर ‘साउंडस ऑफ बीट्स’ या संस्थेच्या माध्यमातून आम्ही कलांगण वाटिका हा उपक्रम राबवीत आहोत, यामध्ये आश्वासक कलाकारांचे सादरीकरण पाहण्याची संधी श्रोत्यांना त्यांच्या राहत्या सोसायटी मिळू शकणार आहे. सदर उपक्रमासाठी आम्हाला विलास जावडेकर डेव्हलपर्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.”

शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी हिंजवडी येथील यशवन मान या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात तेजस्विनी फडके यांचे कथक नृत्य आणि मालविका दीक्षित यांचे गायन रसिकांना अनुभविता येईल तर शनिवार दि. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रतीक राजकुमार यांचे शास्त्रीय गिटार वादन व सतीश कुमार यांचा ‘सुफियाना कबीर’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading