पुण्यात सचिन सातपुते यांच्या लाडकी बहीण ओवाळणी योजनेला प्रचंड प्रतिसाद
पुणे : महाराष्ट्र् राज्यातील बिगर शासकीय असणारा पहिला आणि एकमेव असा उपक्रम,पुण्यातील वडगाव शेरी चंदन नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व सचित सातपुते फाउंडेशन चे संस्थापक सचिन सातपुते यांच्या लाडकी बहीण ओवाळणी योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .एकीकडे शासकीय लाडकी बहीण योजनेच्या अटी वाढत अस्तताना
सचिन सातपुते यांनी मात्र परिसरातील तब्बल 2500 महिलांना दरमहा 1000 हजार रुपये देणारी लाडकी बहीण ओवाळणी योजना सुरू केली असून ती योजना महिलामध्ये अतिशय लोकप्रिय होताना दिसून येत आहे .
सचिन सातपुते यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचा शुभारंभ केला असून 2500 महिलांचा त्यांचा संकल्प जवळजवळ पूर्णत्वास येत असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे .राज्यातील आणि देशातील हा खाजगी व सामाजिक स्तरावर चालणारा पहिला आणि एकमेव उपक्रम असल्याचा सातपुते यांनी दावा केला आहे .तसेच भविष्यात हा उपक्रम पुणे शहर आणि जिल्हा स्तरावर राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे .
