Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

थंडीची लाट डिसेंबर अखेरपर्यंत राहणार

पुणे:: प्रतिनिधी 

हितवाह चक्रीवादळामुळे हवामानात होत असलेल्या सडक उतारांचा प्रभाव ओसरला असून आता राज्याच्या बहुतेक भागात थंडीच्या लाटेचा प्रभाव राहील. ही थंडीची लाट डिसेंबर अखेरपर्यंत कायम राहील, असा इशारा भारतीय हवामानशस्त्र विभागाने दिला आहे. 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या आणि श्रीलंकेत थैमान घातलेल्या हितवाह चक्रीवादळामुळे राज्याच्या काही भागात तापमानात वाढ होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. मात्र, हा प्रभाव आता विसरला आहे. 

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात थंडीची लाट निर्माण होऊन तापमानाचा पारा लक्षणीय रित्या कमी होण्याची शक्यता हवामानाशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सध्याच्या काळातही कोकण किनारपट्टी उघडता बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. थंडीच्या लाटेचा परिणाम म्हणून ते यापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे. 

विदर्भ आणि मराठवाड्यावर उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव आताही कायम आहे. या पुढील काळात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांसह पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढलेला अनुभवायला मिळणार आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading