Wednesday, May 20, 2026
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; ४२ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला

मुंबई  : भारतीय पॉप कल्चरमध्ये आपल्या खास शैलीने स्थान निर्माण करणारी अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे शेफाली यांनी अखेरचा श्वास घेतला.

काल (२७ जून) रात्री उशिरा, त्यांना अंधेरीतील त्यांच्या राहत्या घरी अचानक त्रास जाणवू लागला. तातडीने बेल्व्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 तपास सुरु – पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा

मुंबई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत फॉरेंसिक टीमच्या मदतीने तपास सुरू केला आहे. मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोस्टमॉर्टम अहवालातून नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी पती पराग त्यागी यांचा जबाब नोंदवला आहे. अद्याप कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नसली तरी, नियमाप्रमाणे सर्व तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

मनोरंजन विश्वात शोककळा

शेफाली जरीवालाच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर मीका सिंग, हिमांशी खुराना, अली गोनी, किश्वर मर्चंट यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त करत शेफालीला श्रद्धांजली अर्पण केली.

पती पराग त्यागी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना भावनांनी भरलेल्या अवस्थेत दिसले. शेफालीच्या आई-वडिलांवरदेखील या घटनेचा तीव्र परिणाम झाला आहे.

 ‘कांटा लगा’मधून प्रसिद्धीच्या शिखरावर

२००२ साली आलेल्या DJ Doll’s कांटा लगा या गाण्याच्या रिमिक्स व्हिडिओमुळे शेफाली जरीवाला रातोरात घराघरात पोहोचल्या. त्यांच्या हटके लूक, नृत्यशैली आणि आत्मविश्वासामुळे त्या युथ आयकॉन ठरल्या.

त्यानंतर त्यांनी बिग बॉस १३ मध्ये भाग घेत आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पुन्हा एकदा उमटवली. अभिनय, मॉडेलिंग आणि रिअ‍ॅलिटी शो यांमध्ये त्यांनी अढळ स्थान निर्माण केले.

 शेवटचा निरोप

शेफाली जरीवाला यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी मुंबईत त्यांच्या निवासस्थानाजवळील स्मशानभूमीत पार पडण्याची शक्यता आहे. अधिकृत वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading