Wednesday, May 20, 2026
Latest NewsNATIONALPUNE

पुण्याच्या कंपनीची ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची मदत

पुणे  : पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी अंमलात आणलेल्या ऑपरेशन सिंदूरमधील महत्त्वपूर्ण मदतीकरता पुण्याच्या समुद्र एलईडी या कंपनीचे कौतुक पंजाब मधील अमृतसर स्मार्ट सिटी को ऑपरेशन यांच्या वतीने नुकतेच करण्यात आले आहे.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान कंपनीच्या लाईटिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर (एलएमएस)च्या मदतीने काही क्षणांत शहरातील तब्बल ८० हजार पथदिवे बंद करणे प्रशासनाला सोपे झाल्याने याची मदत ऑपरेश सिंदूर दरम्यान महत्वपूर्ण ठरली, या मदतीकरीता समुद्र एलईडी कंपनीचे कौतुक अमृतसर स्मार्ट सिटी को ऑपरेशन यांच्या वतीने नुकतेच करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना समुद्र एलईडी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल थोते म्हणाले, “पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी अंमलात आणलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तान या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती हाताळत असताना पुण्यातील समुद्र एलईडी या कंपनीची बहुमोल मदत पंजाब मधील अमृतसर येथील स्थानिक प्रशासनाला झाली. गेल्या काही वर्षांत या शहरात पथदिवे बनविण्याचे काम समुद्र एलईडी कंपनीचे असून ऑपरेश सिंदूर दरम्यान आमच्या कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या लाईटिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा फायदा या जिकिरीच्या परिस्थितीत झाला. आणि प्रशासनाच्या अपेक्षेनुसार आमच्या या सॉफ्टवेअरने वेळोवेळी काही क्षणांत अमृतसर शहरातील तब्बल ८० हजार पथदिवे बंद आणि नंतर चालू केले.”

अशा पद्धतीने ही युद्धजन्य परिस्थिती हाताळत असताना समुद्र एईडी या कंपनीने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार त्या त्या वेळी पथदिवे बंद – चालू करण्यात आले आणि त्या वेळी सुरु असलेल्या ऑपरेशन सिंदूर ला काही प्रमाणात का होईना आमचाही हातभार लागला याचे समाधान यावेळी प्रफुल्ल थोते यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या ऑपरेशन्स व मेंटेनन्स टीमचे मनिंदर सिंग यांनी मोलाची भूमिका निभावली असल्याची माहिती प्रफुल्ल थोते यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading