Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNE

संजीव सोशल फाउंडेशन तर्फे वारकऱ्यांची मालीश, कटिंग-दाढी, चप्पल व बॅग दुरुस्ती 

पुणे : छाया संजीव गदादे व संजीव सोशल फाउंडेशन च्या वतीने जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी दाढी, कटिंग, बॅग चप्पल व छत्री दुरुस्ती तसेच थकलेल्या वारकऱ्यांची मालिश व फराळ वाटप अशा सेवा देण्याचा उपक्रम राबवण्यात आला.  दोन हजार पेक्षा जास्त वारकऱ्यांनी उपक्रमाचा लाभ घेतला.

जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज  ह. भ. प. श्री. नितीन महाराज मोरे यांनी ह्या उपक्रमास आवर्जून हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. उपक्रमाचे उदघाट्न आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या हस्ते झाले.  या वेळी भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे, मांजरी गावाचे माजी सरपंच शिवराज आप्पा घुले पाटील, माजी सरपंच पुरुषोत्तम धरवाडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वप्नील चतुर, लोकसेवा बँकेचे संचालक शिवाजी माळी, माजी उपसरपंच समीर घुले,  विधी तज्ज्ञ नानासाहेब म्हस्के, शिवसेना युवा नेते विशाल ढोरे, सीमा शेंडे, सत्यवान घुले, मांजरी ग्रीनवूड्स चे अध्यक्ष तुषार जाधव, युवा नेते बापूसाहेब मेमाणे, गिरीश कुंजीर, कोमल झगडे, मयूर झगडे, आबा सातव ,संतोष खळदकर,  मंगेश लडकत, अश्विनी माळी, अश्विनी लडकत, अनिता नरके, नजमा शेख उपस्थित होते. पर्वती येथील गदादे पाटील कुटुंबीय हे मागील ३६ वर्षे हा उपक्रम राबवित असतो. ह्या उपक्रमास वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या प्रेमराज शिवाजी गदादे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संकेत सुभाष गदादे, सूत्र संचालन अभिषेक गदादे यांनी केले. डॉ. आरती वाघोले यांनी आभार मानले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading