महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर व अन्नदान
पुणे : पुण्यातील महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशनच्या वतीने नुकतेच एन सी एल पाषाण रोड येथे विसावासाठी असलेल्या ५०० वारकऱ्यांसाठी तीन दिवस मोफत आरोग्य शिबीराचे व मोफत अन्नछत्र चे आयोजन करण्यात आले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी तब्बल ५०० वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी करीत त्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप केले तसेच सर्व वारकऱ्यांनी सलग तीन दिवस भोजन प्रसादाचा लाभ घेतला. महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशन ही संस्था गेले अनेक वर्षे सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेली संस्था असून संस्थेच्या माध्यमातून वर्षभर अनेक समाजपयोगी उपक्रम हाती घेतले जातात.
