Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNE

 गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे वारकऱ्यांना अन्नदान 

 

पुणे : प्रभात तरुण मित्र मंडळ, करण ग्रुप, डेक्कन जिमखाना नागरिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ कृष्ण गोखले चौक, कॅफे गुडलक शेजारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या निमित्त वारकरी बंधू भगिनींना सेवा म्हणुन राजगिरा लाडू, बिस्किटे, भेळ, पाण्याच्या बाटल्या असे विविध खाद्य पदार्थ वाटण्यात आले. ग्रुप मधील महिलांनी फेर धरून विठू माऊली च्या नामाचा गजर केला. तसेच फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.अतिशय भक्तिमय आणि उत्साहवर्धक वातावरणात परिसरातील सर्व नागरिकांनी हे सामाजिक कार्य एकत्र येऊन साजरे केले. अपूर्व सोनटक्के, केतकी देशपांडे, बाळासाहेब गिराम, किमया ताई ढेकणे, रंजना नाईक, सुवर्णा ऋषी, प्रिया रानडे, वृंदा गराम ,भक्ती साठे, वृंदा बाम, प्राजक्ता जोगळेकर , समर ठाकर, योगेश जोगळेकर,करण तावरे,कल्याण तावरे, विराज तावरे,तसेच कमला नेहरू परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading