एमएचटी सीईटी २०२५ मध्ये पीडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
पुणे : महाराष्ट्रा एमएचटी सीईटी २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. पीडब्ल्यूच्या श्रेया संजय पांडे हिला ९९.९९ पर्सेंटाइल मिळाले असून, ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पीसीएम गटात ९८ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये निर्भय दिलीप लाहोडे (९९.८१) आणि सुकल्प राऊत (९९.६१) यांचाही समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यूचे यूट्यूब चॅनल पीडब्ल्यू महाराष्ट्रचा वापर करून तयारी केली होती. त्यातून संकल्पनेवर आधारित शिक्षण तसेच वन शॉट व्हिडिओसारख्या स्वरूपातून उजळणी करून घेतली जाते.
मला संकल्पनेच्या स्पष्टतेबाबत तडजोड करायची नव्हती,” असे मत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या श्रेयाने व्यक्त केले. “त्याचमुळे मी पीडब्ल्यूचा पर्याय निवडला. मला लेक्चर्सची उजळणी करता यायची, शंका तात्काळ सोडवता यायच्या आणि माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक शालेय तासांभोवती तयार करता यायचे. त्यामुळे मला सर्वांत कठीण विषयांचा सामनाही सहजपणे करता आला.”
या यशाबाबत पीडब्ल्यूचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अलख पांडे म्हणाले, “एमएचटी सीईटी २०२५ ला बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे खूप अभिनंदन. गुण हे यशाचे एकमेव मापदंड नसून, सातत्य, प्रामाणिकपणा आणि प्रयत्न यातूनच खरी प्रगती घडते. विद्यार्थ्यांनी आमच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून उत्तम निकाल मिळवला, हे पाहून आनंद होतो.”
फिजिक्सवाला संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन सराव चाचण्या, वैयक्तिक अभ्यास योजना, शंका निवारण, आणि व्हिडिओ सोल्यूशन्स ग्रंथालय अशा वैशिष्ट्यांसह पीडब्ल्यूमार्फत आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिली जातात.
यंदाच्या एमएचटी सीईटी २०२५ परीक्षेला राज्यभरातून ४.२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.
