Wednesday, May 20, 2026
BusinessLatest News

फेशियल किट्सच्या नवीन रेंजच्या लॉन्चसाठी करण जोहरने ऑक्सीलाइफ सॅलून प्रोफेशनलसोबत केली भागीदारी, आणला नवा कॅम्पेन ‘स्किनश्योरेन्स विथ ऑक्सीलाइफ’

 

डाबर इंडियाच्या प्रीमियम सॅलून स्किनकेअर ब्रँड ऑक्सीलाइफ सॅलून प्रोफेशनलने आपल्या डर्मा एसेंस रेंजअंतर्गत दोन प्रगत फेशियल ट्रीटमेंट किट्स – इंटेन्स ब्राईट आणि सेंसी-केअर लाँच केले आहेत. या लाँचसह कंपनीने प्रसिद्ध चित्रपटनिर्माता आणि स्टाईल आयकॉन करण जोहरसोबत ‘स्किनश्योरेन्स विथ ऑक्सीलाइफ’ हा नवीन कॅम्पेन सादर केला आहे.

हे नवीन सॅलून-एक्सक्लुझिव्ह फेशियल किट्स आधुनिक स्किनकेअर सायन्स आणि त्वचारोगतज्ज्ञांसारखी काळजी एकत्रित करून त्वचेला त्वरीत परिणाम देतात आणि दीर्घकाळासाठी तजेलदार ठेवतात. या रेंजच्या लॉन्चसाठी ऑक्सीलाइफने एक आकर्षक व डिजिटल-प्रथम कॅम्पेन आणले आहे, ज्यात करण जोहर “तुमच्या चेहऱ्याचं इंश्योरेन्स” करण्याबद्दल बोलून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

या कॅम्पेनमध्ये करण विनोदी शैलीत अफवांना वळण देत म्हणतात, “इट्स नॉट जस्ट एनी इंश्योरेन्स, इट्स स्किनश्योरेन्स – युअर रेडियन्स इंश्योर्ड बाय ऑक्सीलाइफ!” (हे केवळ सामान्य विमा नाही, तर ऑक्सीलाइफद्वारे तुमच्या त्वचेच्या तेजाचा विमा आहे).

‘स्किनश्योरेन्स विथ ऑक्सीलाइफ’ हा नवीन कॅम्पेन या गोष्टीवर प्रकाश टाकतो की, तजेलदार त्वचा आपल्याला आतून आत्मविश्वास देते. कॅम्पेनमध्ये करण स्पष्ट करतात की ऑक्सीलाइफचे अ‍ॅडव्हान्स्ड फेशियल ट्रीटमेंट्स हे विज्ञान आणि निसर्ग यांचे सुंदर संमीलन आहे, जे त्वचेची योग्य देखभाल करून तिला सुरक्षित ठेवतात. या कॅम्पेनमधून स्किनकेअरद्वारे आत्मविश्वास वाढवण्याचा संदेश दिला जातो, तसेच ऑक्सीलाइफचे प्रॉडक्ट्स त्वचेला नैसर्गिक तेज कसे देतात हेही समजावले जाते.

करण जोहरसोबत सादर केलेला हा कॅम्पेन हा आत्मविश्वास दर्शवतो, जो सुंदर आणि निरोगी त्वचा मिळाल्यावर अनुभवता येतो. खरंतर, या कॅम्पेनमागील मुख्य कल्पना ही आहे की, आयुष्यात प्रत्येक मौल्यवान गोष्टीचा विमा असायलाच हवा – आणि आपल्या त्वचेच्या तेजापेक्षा मौल्यवान अजून काय असू शकते?

ऑक्सीलाइफचे सूत्र हे केवळ स्किनकेअरपुरते मर्यादित नाही, तर ते तुमच्या त्वचेचा विमा आहे – जो त्वचेची काळजी घेऊन, नैसर्गिकरित्या तिला उजळ बनवतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतो.

कॅम्पेनविषयी बोलताना अभिषेक जुगरान, एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग), डाबर इंडिया लिमिटेड म्हणाले,
“ऑक्सीलाइफ सॅलून प्रोफेशनल पोर्टफोलिओअंतर्गत अ‍ॅडव्हान्स्ड फेशियल ट्रीटमेंट किट्सची नवीन रेंज सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या लॉन्चसह आम्ही प्रीमियम सॅलून स्किनकेअर सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. ही रेंज डर्मटोलॉजिस्ट-प्रेरित व्यावसायिक दर्जाच्या सोल्यूशन्ससह आधुनिक स्किनकेअर गरजांना पुरक आहे.”

करण जोहर या कॅम्पेनसाठी परिपूर्ण चेहरा आहेत. त्यांचा प्रभाव आणि व्यक्तिमत्त्व हे प्रॉडक्ट लॉन्चच्या चौकटीपलीकडे जातं आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करतं. या भागीदारीसह ऑक्सीलाइफने आधुनिक स्टोरीटेलिंगचा नवा अध्याय सुरू केला आहे – जिथे स्किनकेअर आणि कथा सांगण्याची शैली यांचा सुंदर संगम घडतो.

या भागीदारीविषयी करण जोहर म्हणाले,
“जेव्हा मी ‘स्किनश्योरेन्स’ विषयी ऐकलं, तेव्हा मला समजलं की हे माझ्या शैलीचं इंश्योरेन्स आहे! चेहऱ्याचं तेज ही एक मालमत्ता आहे आणि तिला संपूर्ण कव्हरेज मिळायलाच हवं. या कॅम्पेनसोबत जोडून मला खूप चांगलं वाटतंय – हे एक असा प्रयोग आहे, जो स्किनकेअर आणि स्टोरीटेलिंग यांचं सुंदर संमीलन आहे.”

विराट खन्ना, हेड – स्किनकेअर, डाबर इंडिया लिमिटेड यांनी सांगितले,
“आमची नवीन ऑक्सीलाइफ सॅलून प्रोफेशनल फेशियल किट रेंज सॅलून स्किनकेअरमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. आणि करण जोहर ‘स्किनश्योरेन्स विथ ऑक्सीलाइफ’ या कॅम्पेनमध्ये ग्लॅमरची भर घालत आहेत. आम्हाला विश्वास आहे की आमची त्वरीत व दीर्घकाळ परिणाम देणारी फेशियल किट्स आजच्या जाणकार ग्राहकांच्या स्किनकेअर गरजा पूर्ण करतील.”

जसलीन कोहली, डिजिटल लीड – होम अँड पर्सनल केअर, डाबर इंडिया लिमिटेड म्हणाल्या,
“डिजिटल स्टोरीटेलिंगवर लक्ष केंद्रित करत आमचं कॅम्पेन ‘स्किनश्योरेन्स विथ ऑक्सीलाइफ’ आम्हाला अशा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, जे स्किनकेअरला महत्त्व देतात. मीम कल्चरपासून बॉलिवूड पेजेस आणि इन्फ्लुएंसर एंगेजमेंटपर्यंत, या कॅम्पेनचा प्रत्येक पैलू असा डिझाईन केला आहे की तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑक्सीलाइफला अधिक सुसंगत बनवतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading